पाचकंदील चौकातील शंकर मार्केटला लागलेल्या आगीत उद्धवस्त झालेल्या कापड दुकानदारांना त्वरित आर्थिक मदत दया - आमदार फारूक शाह* *महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे आमदार फारूक शाह यांची मागणी...! उचित कारवाई करण्याचे दिले आदेश..!
पाचकंदील चौकातील शंकर मार्केटला लागलेल्या आगीत उद्धवस्त झालेल्या कापड दुकानदारांना त्वरित आर्थिक मदत दया - आमदार फारूक शाह
महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे आमदार फारूक शाह यांची मागणी...! उचित कारवाई करण्याचे दिले आदेश..!
(धुळे दि. २९-०६-२०२१) धुळे शहरात असलेल्या पाचकंदील चौकातील शंकर मार्केटला २८ जूनच्या पहाटे अचानक लागलेल्या आगीत ३५ ते ४० दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. कोरोना, लॉकडाऊन, त्यात व्यवसाय नाही आणि अचानक लागलेल्या आगीतदुकाने खाक झाली. हा दुकानदारांसाठी मोठा जबर हादरा आहे. अनेक व्यावसायिकांना दुकानांना लागलेली आग पाहून अश्रू अनावर झाले. यात कापड दुकानदारांचे २ ते ३ कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहेत. अश्यावेळी संबंधित विभागाकडून तात्काळ पंचनामे करून मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदील चौकातील शंकर मार्केटला लागलेल्या आगीत उद्धवस्त झालेल्या कापड दुकानदारांना त्वरित आर्थिक मदत दया या अशी मागणी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मुंबई येथे भेट घेत केली. आमदार फारूक शाह यांनी यावेळी सत्य परिस्थिती कथन करत सांगितले कि पाचकंदील चौकातील शंकर मार्केटमध्ये सर्वच जाती धर्मातील व्यापारी गुण्यागोविंदाने आपला व्यापार करतात. आजच्या परिस्थितीत कोरोना, लॉकडाऊन, त्यात व्यवसाय नाही आणि अचानक लागलेल्या आगीतदुकाने खाक झाली. हा दुकानदारांसाठी मोठा जबर हादरा आहे. अनेक व्यावसायिकांना दुकानांना लागलेली आग पाहून अश्रू अनावर झाले साहेब यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत दया असे साकडे धुळेकर व्यापाऱ्यांच्या वतीने घातले. यावर महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उचित कारवाई करण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले आहेत.
AIMIM MAHARASHTRA OFFICIAL
Comments
Post a Comment